तळेगावात करवसुली मोहीम जोरात | पुढारी

तळेगावात करवसुली मोहीम जोरात

तळेगाव दाभाडे : तळेगाव नगरपरिषदेकडून घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची धडक मोहीम हाती घेण्यात आलेली असून, थकबाकीची रक्कम वेळेत न भरल्यास मालमत्ता जप्त करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले. तळेगाव दाभाडे शहरातील सर्व मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची घरपट्टी आणी पाणीपट्टीची बिले पाठविण्यास सुरूवात करण्यात आलेलीआहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्वांना ही बिले पोहोच होतील, असे मुख्याधिकारी सरनाईक यांनी सांगितले.

चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करापोटी 43 कोटी 24 लाख 3 हजार रुपये कर वसूल करावयाचा आहे. तर पाणी पट्टी म्हणून 8 कोटी रुपये वसूल करावयाचे आहेत. कर संकलन अधिकारी विजय शहाणे, पाणी पुरवठा अधिकारी स्मिता गाडे हे अधिकारी वसुली मोहीम राबवित आहेत. घरपट्टी वसुलीसाठी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक आणि उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक वसुली धोरण राबवण्यात येत आहे.

पाणीपट्टी वसुलीबरोबरच बेकायदा नळजोड असणार्‍या मालमत्ता धारकांनी 15 ऑगस्टपर्यंत नियमानुसार कर भरणा न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.                                                  – विजयकुमार सरनाईक, मुख्याधिकारी

Back to top button