चिंचवड रेल्वे स्थानकासमोर वाहनांचे अवैध पार्किंग | पुढारी

चिंचवड रेल्वे स्थानकासमोर वाहनांचे अवैध पार्किंग

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चिंचवड रेल्वे स्थानक येथील रिझर्वेशन सेंटरसमोर अवैधरीत्या वाहनांची पार्किंग होत आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यास अडथळा होत आहे. वाहतूक विभागही याकडे डोळेझाक करीत आहे, अशी तक्रार प्रवाशी करीत आहेत. रेल्वे स्थानकासमोर काही महिन्यांपूर्वी अ‍ॅटोरिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात आले आहे.

येथील रस्ता पूर्वीच निमुळता होता. त्यात आणखी भर म्हणजे रिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यात आले. मात्र याच जागेत बेकायदेशीपणे चारचाकी वाहने पार्क केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना पायी चालणेही अवघड होऊन बसले आहे. या स्थानकामधून लोकलच्या प्रवाशांसह मुंबईला ये-जा करणार्‍या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच शहरातील रिझर्वेशन सेंटरही स्थानकात आहे. त्यामुुळे सतत स्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ सुरू असते. परंतु वाहतूक विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील वाहनांवर कारवाई होत नाही. परिणामी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून वाहतूक शाखेने स्थानकासमोरील वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button