पोंदेवाडीतील शेतकर्‍यांची विहीर पावसाने ढासळली | पुढारी

पोंदेवाडीतील शेतकर्‍यांची विहीर पावसाने ढासळली

मंचर; पुढारी वृत्तसेवा: पोंदेवाडी येथील शेतकरी संतोष मारुती ढमाले यांच्या शेतातील विहीर अतिवृष्टीमुळे ढासळली असून, काही प्रमाणात गाडली गेल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पोंदेवाडी परिसरात काही दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. या पावसात पोंदेवाडी येथील अनेक शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचून नुकसान झाले होते, तर अनेकांच्या घरांच्या भिंती देखील पडल्या होत्या.

ढमाले यांच्या शेतातील विहिरीचे बांधकाम सुमारे नऊ ते दहा फूट उंचीचा कठडा पूर्णपणे ढासळून विहिरीत पडला आहे. विहीर निम्मी गाडली गेली असून, तिचे पाणी सर्वत्र शेतात पसरत आहे. आता विहिरीतील गाळ काढण्यासाठी अंदाजे 30 ते 40 हजार रुपये तसेच कठड्याचे बांधकाम करण्यासाठी 1 लाख रुपये खर्च येणार असल्याचे ढमाले यांनी सांगितले.

Back to top button