पिंपरी : साडेपाच लाखांची बावधनमध्ये चोरी | पुढारी

पिंपरी : साडेपाच लाखांची बावधनमध्ये चोरी

पिंपरी : दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऑफिसमधील पाच लाख 35 हजार 506 रुपयांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 2) मध्यरात्री अडीच ते साडेतीनच्या दरम्यान पाटील नगर, बावधन येथे घडली. दिलीप बबन धावडे (58, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पाटीलनगर, बावधन येथे इन्फिनिटी इंटरप्रायजेस नावाने ऑफिस आहे. दरम्यान, चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडून आतील महागडी घड्याळे, ब्ल्यूटुथ, गॉगल फ्रेम, सिग्नेचर गॉगल फ्रेम, बॅग, रोख रक्कम आणि 25 चेक असे एकूण पाच लाख 35 हजार 506 रुपयांचे साहित्य चोरून नेले. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button