पिंपरी : गाडीला लाल दिवा लावणार्‍यांवर गुन्हा | पुढारी

पिंपरी : गाडीला लाल दिवा लावणार्‍यांवर गुन्हा

पिंपरी : गाडीला लाल दिवा लावून फिरणार्‍या दोन अल्पवयीन मुलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार मंगळवारी (दि. 2) पिंपरी येथे उघडकीस आला. याप्रकरणी पोलिस नाईक राजेंद्र बारशिंगे यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बारशिंगे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास हद्दीत गस्त घालत होते.

दरम्यान, ऑटो क्लस्टरजवळ त्यांना लाल दिवा असलेली कार दिसली. त्यावेळी गाडीत आरोपी मुले बसले होते. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी कार आणि आणि लाल दिवा जप्त केला करीत गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button