पिंपरी : लुबाडणार्‍या तिघांना अटक, कर्ज देण्याचा बहाणा करून लुटले

पिंपरी : लुबाडणार्‍या तिघांना अटक, कर्ज देण्याचा बहाणा करून लुटले
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कर्ज देण्याचा बहाणा करून लुटणार्‍या तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. या टोळीने बाणेर आणि नवी मुंबई येथे कार्यालये सुरू करून अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कारवाई केली. जलाराम इंटरप्रायजेस लिमिटेडची मॅनेजर महिला, संदीप रामचंद्र समुद्रे (37, रा. कल्याण पूर्व, ठाणे), जयजित रामसनेही गुप्ता (36, रा. डोंबिवली पश्चिम, कल्याण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी श्रीराम प्रल्हाद पिंगळे (43, रा. कोथरूड, पुणे) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मित्राने सोशल मीडियावर जलाराम इंटरप्रायजेस प्रायव्हेट फंड या कंपनीची व्यवसायासाठी कर्ज देण्याबाबत जाहिरात पहिली. दरम्यान, फिर्यादी यांनी संपर्क केला असता एका महिलेने त्यांना बाणेर येथे बोलावून घेतले. एक कोटी रुपयांचे कर्ज हवे असेल तर पाच लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट द्यावे लागतील. 45 दिवसात कर्ज दिले जाईल, असे महिलेने सांगितले. मात्र, फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्यानुसार, हिंजवडी पोलिसांनी महिलेकडे चौकशी केली असता तिच्याकडे असलेली माहिती अपूर्ण आणि विश्वासपात्र नसल्याचे समोर आले. हिंजवडी पोलिसांनी बाणेर येथील कंपनीत जाऊन चौकशी केली असता आरोपी महिला तिथे मॅनेजर म्हणून काम करत होती. तिच्याकडे कंपनीचे रजिस्ट्रेशन, आरबीआयच्या नियमानुसार परवानगी नोंदणी नसल्याचे निदर्शनास आले. तसेच, महिलेने सात महिलांना अपॉइंटमेंट लेटर न देता कामावर ठेवले होते.

त्यामुळे पोलिसांनी मॅनेजर महिलेला अटक करून कंपनीचे 13 संगणक, सात मोबाईल फोन, दोन कर्ज प्रकरण संबंधित कागदपत्रे जप्त केली. आरोपी महिलेचा साथीदार संदीप समुद्रे आणि मालक जयजित गुप्ता या दोघांना देखील मुंबईमधून अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहाय्यक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक रमेश पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news