पिंपरी : ऑगस्टमध्ये वाढला उकाडा, पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ | पुढारी

पिंपरी : ऑगस्टमध्ये वाढला उकाडा, पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ

पिंपरी : जुलै महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाच्या विश्रांतीनंतर आता ऑगस्टमध्येच उकाडा चांगलाच जाणवू लागला आहे. दिवसभर कडक उन्हामुळे तापमानात वाढ होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी (दि.3) 32 अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात दहा ते पंधरा दिवस जोरदार पावसाने शहरवासीय गारठून गेले होते.

यांनतर पावसाच्या विश्रांतीनंतर आता दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने भर दुपारी बाहेर पडणार्‍यांचे हाल होत आहेत. उकाड्याने घरातील आणि कार्यालयातील वातानुकुलित यंत्रणा जलद गतीने फिरत आहे. यामध्ये जर कधीकाळी वीज गेली तर नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत. यावर्षी उन्हाळ्यातील भयानक उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला होता. पण पावसाने पूर्णत: उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली आहे.

Back to top button