पिंपरी : विषारी औषध खाल्ल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू | पुढारी

पिंपरी : विषारी औषध खाल्ल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू

पिंपरी : विषारी औषध खायला दिल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 1) रात्री सात ते मंगळवारी (दि. 2) सकाळी नऊच्या दरम्यान लिंकरोड, चिंचवड येथे घडली. हितेश जयपाल कुंदनानी (32, रा. लिंक रोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या परिसरातील भटके श्वान बेशुद्ध अवस्थेत पडले होते. फिर्यादी यांनी त्याला औंध येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, श्वानाचा मृत्यू झाला. विषारी पदार्थ खाल्ल्याने छातीत रक्तस्राव झाल्याचा अंदाज व्यक्त करत डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला.

Back to top button