भीमाशंकर परिसरात रानफुलांचा बहर; हिरवा शालू पांघरून सृष्टीची पर्यटकांना साद

1.भीमाशंकर परिसरातील गोहे तलाव भरून 
वाहत आहे.  2.पाटण परिसरातील निसर्गरम्य दृश्य. (छाया : अशोक शेंगाळे)
1.भीमाशंकर परिसरातील गोहे तलाव भरून वाहत आहे. 2.पाटण परिसरातील निसर्गरम्य दृश्य. (छाया : अशोक शेंगाळे)
Published on
Updated on

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात पावसामुळे रानफुलांनी परिसर सजला आहे. सर्वत्र हिरवळीची व धुक्यांची शाल, अधूनमधून पडणार्‍या श्रावणसरी पर्यटकांना खुणावत आहेत. पोखरी घाटातील गोहे पाझर तलाव भरून वाहत असून ओढे – नालेही भरून वाहत आहेत. भीमाशंकर, पाटण, आहुपे परिसरात सध्या अधूनमधून येणारा पाऊस, दाट धुके, बोचरी थंडी असे वातावरण आहे.

डोंगर-टेकड्या हिरवा शालू पांघरूण आभाळालाही लाजवेल अशी नटून बसल्या आहेत. निसर्गाचा सहवास घेण्यासाठी पर्यटकांनी येण्यास सुरुवात केली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासह नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉइंट, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे यांसह भीमाशंकर अभयारण्यात फिरण्यासाठी मुंबई- पुणे व इतर राज्यांतुन पर्यटक येत आहेत. माळीण नवीन व जुने गाव, आहुपे येथील कोकणकडे व निसर्गाचा खजाना पर्यटक मनमुराद लुटत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news