मान्सून पुन्हा होणार सक्रिय | पुढारी

मान्सून पुन्हा होणार सक्रिय

पुणे : गेल्या तीन आठवड्यांहून अधिक काळ पावसाने उघडीप दिली होती. आता मात्र गुरुवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे.

पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग या भागांसह घाटमाथ्यावर तसेच मराठवाडा भागातील बहुतांश जिल्ह्यांत 7 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

 

Back to top button