पुणे : दोन जुगार अड्ड्यांवर सहकारनगरमध्ये छापा; 35 जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : दोन जुगार अड्ड्यांवर सहकारनगरमध्ये छापा; 35 जणांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणार्‍या जुगार अड्ड्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. सुनील निर्मळच्या दोन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 35 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या वेळी 1 लाख 56 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास सामाजिक सुरक्षा विभागाला सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणार्‍या अवैध मटक्याच्या धंद्याबाबत माहिती मिळाली होती. सर्वे नंबर 37/1, फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील निर्मळ हा त्याच्या साथीदारांमार्फत दोन वेगवेगळ्या ठिकाणी तो चालवत होता.

छाप्यानंतर दुसर्‍या दिवसापासून पुन्हा सुरू
जुगार अड्डाचालक व मालक सुनील नारायण निर्मळ, अभिषेक सुर्वे, किशोर लक्ष्मण कांबळे हे सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार आहेत. सामाजिक सुरक्षा विभागाकडून या जुगार अड्ड्यांवर यापूर्वी 1 जून रोजी छापा टाकण्यात आला होता; परंतु छाप्यानंतर दुसर्‍या दिवसांपासूनच हा जुगार अड्डा पुन्हा बिनदिक्कतपणे सुरू झाल्याचे सामाजिक सुरक्षा विभागाने कळवले. वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button