पुणे : फरारी गुन्हेगाराला पिस्तुलासह पकडले | पुढारी

पुणे : फरारी गुन्हेगाराला पिस्तुलासह पकडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला फरासखाना पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
ऋषिकेश सुनील बागूल (वय 24, रा. एसआरए बिल्डिंग, शिंदेवस्ती, हडपसर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. बागूल हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध शहरातील विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो गेल्या काही दिवसांपासून फरासखाना व हडपसर पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यात फरारी होता.

फरासखाना पोलिसांचे तपास पथक हद्दीत पोलिस कर्मचारी राकेश क्षीरसागर गस्ती वर होते. त्यावेळी गणेश पेठेतील दगडी नागोबा मंदिर येथे एक व्यक्ती थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, कर्मचारी मेहबूब मोकाशी, रिझवान जिनेडी यांच्या पथकाने छापा टाकून अटक केली. बागूल याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button