पुणे : भवानीनगर-सपकळवाडी रस्ता काम निकृष्ट | पुढारी

पुणे : भवानीनगर-सपकळवाडी रस्ता काम निकृष्ट

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा : भवानीनगर सपकळवाडी रस्त्याचे नुकतेच डांबरीकरण झाले आहे. मात्र, निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण झाल्यामुळे डांबरीकरण एका महिन्यात उखडून रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत

भवानीनगर ते सपकळवाडीदरम्यान सुमारे दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम नुकतेच झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण ठिकठिकाणी उखडले आहे. निकृष्ट कामामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला असून, ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या संबंधित अधिकार्‍यांनी रस्त्याचे काम सुरू असताना कामावर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

भवानीनगरमधून सपकळवाडी, तावशी, ढेकळवाडी, कुरवली, घोलपवाडी या गावांमध्ये जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. परंतु एका महिन्यातच डांबरीकरण उखडून खड्डे पडू लागल्यामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे रस्त्याच्या कामाचा निधी संबंधित ठेकेदाराकडून वसूल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Back to top button