भाऊ-बहिणीने सख्ख्या भावाचाच काढला काटा, तब्बल ५ वर्षांनी गुन्हा उघडकीस

भाऊ-बहिणीने सख्ख्या भावाचाच काढला काटा,  तब्बल ५ वर्षांनी गुन्हा उघडकीस
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पाच वर्षांनंतर केवळ माहितीच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठत गुन्हे शाखेच्या पथकाने एका खुनाचा छडा लावला आहे. एरंडवणा परिसरातील घर स्वत:च्या नावावर करण्यासाठी तगादा लावून त्रास देत असल्याच्या कारणावरून भाऊ व बहिणीने इतर दोघांच्या मदतीने आपल्या सख्ख्या भावाला कॅनॉलमध्ये ढकलून देऊन त्याचा खून केला होता.

पंकज चंद्रकांत दिघे (वय 23, रा. भालेकर चाळ, एरंडवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सुहास दिघे, अश्विनी अडसूळ, प्रशांत यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, महेश बाबूराव धनावडे (वय 37, रा. देशमुखवाडी, शिवणे) याला अटक केली आहे. पोलिस हवालदार राजेंद्र मारणे यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 14 ते 18 मार्च 2017 दरम्यान घडला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालमत्तेच्या वादातून सतत त्रास देत असल्याच्या कारणातून चौघांनी कट रचून पंकजचा पाण्याच्या कॅनॉलमध्ये ढकलून देऊन खून केला.

दरम्यान, फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टशेजारील उसाच्या शेताजवळ असलेल्या कॅनॉलमध्ये 18 मार्च 2017 रोजी एक मृतदेह आढळला होता. त्याबाबत अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. त्याचवेळी डेक्कन पोलिस ठाण्यात पंकज दिघे याची बेपत्ता म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती. आपण काहीच केले नसल्याच्या आविर्भावात सर्व आरोपी फिरत होते. मात्र, तपास करीत असताना तसेच साक्षीदारांकडे केलेल्या चौकशीत घराच्या वादातून पंकज दिघे याला कॅनॉलच्या पाण्यात ढकलून त्याचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

दिघे यांचे एरंडवणा येथे एका चाळीत घर आहे. सुहास दिघे आणि त्यांची बहीण अश्विनी यांचा भाऊ पंकज हा त्यांना राहते घर स्वत:च्या नावावर करण्याकरिता त्रास देत होता. त्या कारणावरून त्यांनी प्रशांत व महेश धनावडे यांच्यासमवेत कट रचला. 14 मार्च 2017 रोजी सायंकाळी पंकजला तवेरा गाडीत घालून पळवून नेले. गाडीत मारहाण केली. त्याला हडपसर येथील कॅनॉलमध्ये ढकलून दिले. त्यानंतर पाच दिवसांनी सुहास दिघेने डेक्कन पोलिस ठाण्यात भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

पंकजच्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी महेश धनावडेला ताब्यात घेऊन चौकशी केली. पोलिस खाक्या दाखवताच त्याने या सर्व प्रकाराची कबुली दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिता मोरे यांनी दिली. या प्रकरणाचा तपास अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, उपनिरीक्षक गुंगा जगताप, अजितकुमार पाटील, कर्मचारी संतोष क्षीरसागर, राजेंद्र मारणे, शरद वाकसे, गणेश शिंदे यांच्या पथकाने केला.

घरफोडीच्या आरोपीकडून खुनाचा गुन्हा उघड
गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाचे पोलिस हवालदार राजेंद्र मारणे व पोलिस अंमलदार गणेश शिंदे यांना मिळालेल्या माहितीवरून सुहास चंद्रकांत दिघे (वय 30, रा. भालेकर चाळ, एरंडवणा) आणि अनिल बाबू बावधने (वय 23, रा. सरगम सोसायटी, वारजे जकातनाका, कर्वेनगर) यांना ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील 5 लाख 12 हजारांचे दागिने हस्तगत केले. याची चौकशी करीत असताना सुहास दिघेने आपला भाऊ पंकज दिघेचा खून केल्याचे उघडकीस आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news