...अखेर दापोडीतील झाडांच्या फांद्या तोडल्या | पुढारी

...अखेर दापोडीतील झाडांच्या फांद्या तोडल्या

दापोडी : शितळादेवी चौक येथील वाहतूक नियंत्रक दिवे झाडाच्या फांदीमध्ये झाकाळून गेले होते. त्यामुळे वाहतूक दिवे न दिसल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत होती. या संदर्भातील वृत्त ‘दैनिक पुढारी’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक दिव्यानी मोकळा श्वास घेतला आहे.

महापालिकेच्यावतीने लाखो रुपये खर्च करून मुख्य चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी याकरिता वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे दिवे झाडांच्या फांद्यामध्ये झाकाळून गेल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. वाहतूक दिवे झाडांच्या फांदीमध्ये झाकून गेल्यामुळे वाहनचालकांना वाहतूक नियंत्रक दिवे दिसत नव्हते. त्यामुळे भरधाव वेगाने आलेल्या चालकांना अचानक ब्रेक दाबावे लागत होते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले होते. सध्या दिवे अडकलेल्या झाडाच्या फांद्यांची छाटणी केल्यामुळे वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button