पुणे : सराईत टोळीचा बसडेपोत ‘राडा’ | पुढारी

पुणे : सराईत टोळीचा बसडेपोत ‘राडा’

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खडकी बाजारातील पीएमपी स्थानकात गोंधळ घालणार्‍या टोळक्याला समजावून सांगणार्‍या पीएमपी चालक, वाहक तसेच नियंत्रकाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या टोळक्याने पीएमपी बसवर दगडफेक करून तोडफोड करीत दहशत माजवली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. यश प्रवीण गोपनारायण (रा. महादेववाडी, खडकी), यश चांदणे, हर्षद चांदणे, प्रणव काळे, शुभम आगलावे, तरंग परदेशी, आनंद साळुंखे, मल्हार अवघडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

यातील गोपनारायणला अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पीएमपीचालक रामलिंग हरिभाऊ बेडके (वय 41, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. खडकी बाजारातील पीएमपी स्थानक परिसरात आरोपी थांबले होते. आरोपी मोठमोठ्या आवाजात बोलत होते तसेच एकमेकांना शिवीगाळ करीत होते. पीएमपी स्थानकात गोंधळ घालणार्‍या आरोपींना पीएमपी बसचालक बेडके यांनी समजावून सांगितले. तेव्हा आरोपींनी पीएमपी बसच्या काचेवर दगडफेक केली तसेच बेडके आणि त्यांचे वाहक सहकारी यांना मारहाण केली. सहायक पोलिस निरीक्षक अमर कदम तपास करीत आहेत.

Back to top button