पिंपरी : पोस्टातून बोलत असल्याचे सांगून फसवणूक | पुढारी

पिंपरी : पोस्टातून बोलत असल्याचे सांगून फसवणूक

पिंपरी : पोस्ट ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून एका महिलेची एक लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. आकुर्डी येथे 2 जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी महिलेने सोमवारी (दि. 1) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

आरोपीने फिर्यादीला फोन करून आपण दिल्ली येथील पोस्ट ऑफिसमधून बोलत असून तुमचा पासपोर्ट आला आहे, तो मिळवण्यासाठी एक लिंक पाठवून त्यावर माहिती भरण्यास सांगितले. त्यानुसार, महिलेने लिंक ओपन केली असता रुपये परस्पर हस्तांतरित झाले.

Back to top button