पुणे : पालिकेविरुद्धची तक्रार फेटाळली | पुढारी

पुणे : पालिकेविरुद्धची तक्रार फेटाळली

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जनता वसाहत पर्वती पायथा येथील एका रहिवाशाच्या मुलाचा मृत्यू डेंग्यूमुळे झाल्यानंतर वीस लाख रुपये नुकसानभरपाई मिळण्यासाठी संबंधित व्यक्तीने ग्राहक न्यायालयात महापालिकेविरोधात धाव घेतली होती. ही तक्रार अतिरिक्त जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख आणि सदस्य शुभांगी दुनाखे यांनी फेटाळली.

तक्रारदारांनी त्यांच्या मुलाच्या मृत्यूचे कारण डेंग्यू असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. पुणे महापालिकेने सेवाशुल्क घेऊनही तक्रारदार राहात असलेल्या परिसरात डेंग्यू प्रतिबंधित कारवाई व योग्य औषधफवारणी केली नाही. त्यामुळे तक्रारदारांचा मुलगा डेंग्यूचा डास चावून मृत्युमुखी पडला. स्वच्छ व निरोगी जीवन जगण्याचा अधिकार महापालिकेने हिरावून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. केलेले आरोप तक्रारदार सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळे ग्राहक आयोगाने तक्रार फेटाळल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी निशा चव्हाण यांनी दिली.

Back to top button