पुणे : रांजणगाव गणपती ते भांबर्डे रस्त्यावर खड्डे

रांजणगाव गणपती, पुढारी वृत्तसेवा : भांबर्डे – रांजणगाव गणपती मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच किरकोळ अपघातही होत आहेत. भांबर्डे – रांजणगाव गणपती रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भांबर्डे ते रांजणगाव गणपती या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. रांजणगाव येथील मुख्य चौकापासून काही अंतरावर खड्डे सुरू झाले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. याच मार्गावर शाळा आहे. खड्ड्यांचा त्रास पालकांंना तसेच विद्यार्थ्यांना होत आहे.

या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. परंतु, त्यांच्याकडून रस्ता दुुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याची डागडुजी न केल्यास येत्या आठ दिवसांत आंदोलनाचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे शिरूर तालुका उपाध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिला आहे.

Exit mobile version