पुणे : रस्त्यावर वाढतेय धोकादायक वाहतूक | पुढारी

पुणे : रस्त्यावर वाढतेय धोकादायक वाहतूक

नानगाव, पुढारी वृत्तसेवा : रस्त्यावर सर्वत्र प्रवासी वाहतूक करणारी वाहने धोकादायकपणे वाहतूक करताना बर्‍याचवेळा दिसून येत असतानाच सध्या वेगवेगळ्या वाहनांत कामगारांनादेखील बसवून वाहने चालवताना आढळून येत आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांवर ट्रेलर, पिकअप, टेम्पोमधून अशा प्रकारे धोकादायक वाहतूक सर्रासपणे केली जाते. रस्त्यावर जास्त वर्दळ नसल्यामुळे अपघाताची शक्यता कमी असते. मात्र, अशीच वाहतूक जर वर्दळीच्या व मोठ्या रस्त्यावर होत असेल, तर ते धोक्याचे ठरते.
सध्या काही वाहनचालक आपल्या वेगवेगळ्या वाहनांतून मोठ्या प्रमाणावर धोकादायक वाहतूक करताना दिसून येत आहे. वाहनांच्या टपावर, कॅरेजवर, मागे फाळक्यावर बसवून देखील वाहनचालक वाहतूक करीत आहेत. सध्या पावसाळा असून, रस्त्यावर पडलेले धोकादायक खड्डे पाहता असा प्रवास करणे खरोखरच धोकादायक आहे.

वाढती वर्दळ, लहान-मोठी वाहने,

मालवाहतूक व अवजड वाहने, यामुळे दिवसेंदिवस रस्त्यावर धोका वाढत चालला आहे. वाढत्या धोक्यात जर काही वाहनांतून व वाहनचालक अशी धोकादायक वाहतूक करीत असतील, तर अशा वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.

Back to top button