पुणे : कोथिंबिरीला बाजारात मिळतोय उच्चांकी दर | पुढारी

पुणे : कोथिंबिरीला बाजारात मिळतोय उच्चांकी दर

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : सध्या कोथिंबिरीला उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. परंतु, सततच्या पावसाचा फटका पिकाला बसला आहे. कोथिंबिरीचे पीक पावसामुळे खराब झाले असून, बाजारभाववाढीचा फायदा शेतकर्‍यांना होत नाही. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाचा फटका मेथी, कोथिंबीर या पिकांना अधिक बसला. पालेभाज्यांची पिके सडून गेली. आता पालेभाज्यांना बाजारभावाची चांगली साथ मिळत आहे. कोथिंबिरीला सध्या शेकडा जुडीला अडीच हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. मेथी जुडीला दहा ते बारा रुपये बाजारभाव मिळत आहे. बाजारभाव समाधानकारक आहे. परंतु, सध्या शेतकर्‍यांकडील कोथिंबीर, मेथी ही पालेभाज्यांची पिके खराब झाली आहेत. त्यामुळे उच्चांकी बाजारभावाचा फायदा शेतकर्‍यांना मिळत नाही.

Back to top button