पुणे : निमगाव केतकीत अडीच टन वजनाच्या पिंडीची प्रतिष्ठापना | पुढारी

पुणे : निमगाव केतकीत अडीच टन वजनाच्या पिंडीची प्रतिष्ठापना

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या निमगाव केतकी (ता. इंदापूर ) येथील कचरनाथ सेवा मंडळाने श्रावणातल्या पहिल्या सोमवारी (दि. 1) कचरेश्वर महादेव मंदिरात अडीच टन वजनाच्या पिंडीची प्रतिष्ठापना केली.

निमगावातील राऊतवाडी येथे कचरेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले आहे. कर्जत येथील अमृतअण्णा खराडे महाराज यांच्या हस्ते महादेव पिंडीची प्रतिष्ठाना करण्यात आली. अडीच टन वजनाची ही पिंड मध्यप्रदेश येथील नर्मदेश्वर येथून आणली आहे. पिंडीची लांबी सहा फूट, रुंदी चार फूट व उंची पाच फूट एवढी आहे.

मंदिरावर कलशारोहण दहिवडी येथील ओम चैतन्य महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. पुजेचा मान गावचे माजी उपसरपंच तुषार जाधव व त्यांच्या पत्नी सोनाली जाधव यांना मिळाला. या वेळी दिवसभर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कचरनाथ सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश महाराज भोंग व त्यांच्या सहकार्‍यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Back to top button