पिंपरी : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले | पुढारी

पिंपरी : पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक लाख 25 हजार रुपये किमतीचे गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. सोमाटणे फाटा येथे रविवारी (दि. 10) दुपारी सव्वातीनच्या सुमारास जबरी चोरीचा हा प्रकार घडला.
याप्रकरणी एका महिलेने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिरत दिली. त्यानुसार, पोलिसांनी दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिला रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास सोमाटणे फाटा येथून पायी जात होत्या. त्यावेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील एक लाख 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले. त्यानंतर चोरटे दुचाकी वरून मुंबई- पुणे जुन्या महामार्गाने पुण्याकडे पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button