मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पुणे शहरासह जिल्ह्यात दौैरा | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा पुणे शहरासह जिल्ह्यात दौैरा

पुणे : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे पुणे जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ते विविध कार्यक्रमांत उपस्थित राहणार आहेत. सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्तालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक-पाणी व विकासकामाची आढावा बैठक घेणार आहेत. शिंदे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानीची माहिती ते घेत आहेत.

सकाळी अकरा वाजता विभागीय आयुक्तालयात पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी, पीक- पाणी व विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर दुपारी एक वाजून 20 मिनिटांनी फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट व पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजून 20 मिनिटांनी जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेणार आहेत. सासवड येथील पालखी तळ मैदानात दुपारी पावणेतीन वाजता शिवसेनेच्या जाहीर सभेला संबोधित करतील. सायंकाळी पावणेसहा वाजता हांडेवाडी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी सात वाजता आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थानी आहेत. सायंकाळी 7.55 वाजता धनकवडीतील शंकर महाराज मठात जाणार आहेत. रात्री पावणेनऊ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिरात आरती करून त्यानंतर पोलिस आयुक्तालयात गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळांंची आगामी उत्सवासंदर्भातील बैठक घेणार आहेत. रात्री सव्वानऊ वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे राखीव असून, रात्री पावणेदहा वाजता मोटारीने ठाण्याला प्रयाण करतील.

Back to top button