पुणे : पावसाचा कलिंगडाला फटका | पुढारी

पुणे : पावसाचा कलिंगडाला फटका

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : आधीच बाजारभावाची बोंब, त्यातच पावसाचा फटका बसल्याने आंबेगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

शिंगवे परिसरात आबाजी गाढवे या शेतकर्‍याने उन्हाळी हंगामात सात एकर कलिंगडाचे पीक घेतले होते. यासाठी सुमारे 7 लाख रुपयांचे भांडवल गुंतविले होते. यंदा चांगल्या बाजारभावाची साथ कलिंगडाला मिळालीच नाही. किलोला दोन-तीन रुपये बाजारभाव मिळाला. कवडीमोल बाजारभावामुळे गुंतविलेले भांडवल वसूल झाले नाही.

या भागात सलग दहा दिवस संततधार पाऊस सुरू होता. त्याचाही फटका कलिंगडाला बसला. शिंगवे, गाढवेवस्तीत झालेल्या मुसळधार पावसाने कलिंगड खराब झाले. त्यामुळे या शेतकर्‍याचे आर्थिक नुकसान झाले. जोरदार पावसाने या भागातील चारापिके, तरकारी, धना, मेथी आदी पिकांचेही नुकसान झाले आहे.

Back to top button