चिकन, मटण, मासळी स्वस्त; श्रावण मासाचा परिणाम | पुढारी

चिकन, मटण, मासळी स्वस्त; श्रावण मासाचा परिणाम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: श्रावणामुळे मासळीच्या मागणीत मोठी घट झाली आहे. परिणामी, शहरातील व्यापार्‍यांकडून कमी प्रमाणात मासळी मागविण्यात येत आहे. बाजारातील आवक एरवीच्या तुलनेत जवळपास निम्म्यावर आली आहे. दरम्यान, मासळीला मागणीही कमी असल्याने दरात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. बाजारात चिकन व मटणाच्या मागणीत घट झाल्याने भावात किलोमागे 20 रुपयांची घसरण झाली आहे. याखेरीज, गावरान अंड्यांचे दर शेकड्यामागे 50 ते 60 रुपये व इंग्लिश अंड्याचे दर 20 रुपयांनी उतरले आहेत. देशाच्या गुजरात, ओडिशा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवरून गणेश पेठेतील मासळी बाजारात मासळीची आवक होत आहे.

सोमवारपासून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरील समुद्रातील मासेमारीवरील बंदी उठणार आहे. परिणामी, पुढील 15 दिवसांत बाजारात मोठ्या प्रमाणात मासळीची आवक होण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यातुलनेत मागणीत वाढ होण्याची शक्यता नसल्याने मासळीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता मासळी व्यापारी ठाकूर परदेशी यांनी वर्तविली. गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 31) खोल समुद्रातील मासळीची 4 ते 5 टन, खाडीची 50 ते 100 किलो, तर नदीच्या मासळीची 100 ते 200 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे 4 ते 5 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1600-1700, मोठे 1400-1500 मध्यम 900-1200, लहान 550-650, भिला : 360-480, हलवा : 700-750, सुरमई : 550-800, रावस : लहान 800 मोठा : 900, करली : 280-320, पाला : 700-1200, वाम : पिवळी 400-480 काळी 240-320, ओले बोंबील : 280-320. कोळंबी : लहान 240-320 मोठी 480-550, जंबोप्रॉन्स : 1200-1400, किंगप्रॉन्स : 750-800, लॉबस्टर : 1200-1400, मोरी : 200-320, खेकडे : 240-280. चिंबोर्या : 440-550, मांदेली : 100-120, राणीमासा- 180-200. खाडीची मासळी : खापी : 240-280, तांबोशी : 480-550, बांगडा : लहान 200 मोठा 240, शेवटे : 360, खुबे : 120-140, लेपा : 200-280, वेळुंजी : 140-160. नदीतील मासळी : रहू : 140-180, कतला : 140-180, मरळ : 400-480, शिवडा : 220-240, खवली : 200-240, आम्ळी : 100-140, खेकडे : 240-280, वाम : 500-550, चिलापी : 50. मटण : बोकडाचे : 680, बोलाईचे : 680, खिमा : 680, कलेजी : 720. चिकन : 180, लेगपीस : 230, जिवंत कोंबडी : 100, बोनलेस : 280. अंडी : गावरान : शेकडा : 850, डझन : 108, प्रतिनग : 9. इंग्लिश : शेकडा : 430, डझन : 60, प्रतिनग : 5.

Back to top button