चाकण : कांदा, बटाटा दरात घसरण; आवक घटल्याचा परिणाम | पुढारी

चाकण : कांदा, बटाटा दरात घसरण; आवक घटल्याचा परिणाम

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांदा व बटाट्याची आवक घटली. आवक कमी होऊनही भावात घसरण झाली. लसणाची आवक दुपटीने वाढली. मात्र, भाव स्थिर राहिले. हिरवी मिरची, वाटाणा व लसणाची आवक वाढली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी व कोथिंबीर यांची भरपूर आवक झाली. शेपू व पालकची आवक घटली. गुरांच्या बाजारात जर्शी गायी, बैल व म्हशींच्या संख्येत घट झाली. एकूण उलाढाल 2 कोटी 30 लाख रुपये झाली. चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 1 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 500 क्विंटलने घटूनही भावात 50 रुपयांची घसरण झाली.

कांद्याचा कमाल भाव 1,400 रुपयांवरून 1,350 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 2,250 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 250 क्विंटलने घटूनही भावात 100 रुपयांची घट झाली. बटाट्याचा कमाल भाव 2,200 रुपयांवरून 2,100 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगा व बंदूक भुईमूग शेंगाची काहीच आवक झाली नाही. लसणाची एकूण आवक 50 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक दुपटीने वाढली व कमाल भाव 4 हजार रुपयांवर स्थिरावले. हिरव्या मिरचीची एकूण आवक 318 क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला 2 हजार रुपयांपासून 3 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :
कांदा – एकूण आवक 1,000 क्विंटल. भाव क्रमांक 1. 1,350 रुपये, भाव क्रमांक 2. 1,100 रुपये, भाव क्रमांक 3. 800 रुपये.
बटाटा – एकूण आवक 2,250 क्विंटल. भाव क्रमांक 1. 2,100 रुपये, भाव क्रमांक 2. 1,900 रुपये, भाव क्रमांक 3. 1,700 रुपये.

फळभाज्या : एकूण आवक क्विंटलमध्ये व प्रति दहा किलोसाठी मालाला मिळालेले भाव कंसात पुढीलप्रमाणे : टोमॅटो – 189 क्विंटल (1 ते 2 हजार रुपये), कोबी – 155 क्विंटल (2 ते 3 हजार), फ्लॉवर – 170 क्विंटल (1 ते 2 हजार), वांगी – 84 क्विंटल (3 ते 5 हजार), भेंडी – 59 क्विंटल (6,500 ते 7,500 रु.), दोडका – 57 क्विंटल (3 ते 4 हजार), कारली – 64 क्विंटल (2,500 ते 3,500 रु.), दुधीभोपळा – 63 क्विंटल (1 ते 2 हजार), काकडी – 71 क्विंटल (1 ते 2 हजार), फरशी – 8 क्विंटल (10 ते 12 हजार), वालवड – 34 क्विंटल (4 ते 6 हजार), गवार – 54 क्विंटल (4,500 ते 5,500 रू.), ढोबळी मिरची – 118 क्विंटल (1,500 ते 4,500 रु.), चवळी – 29 क्विंटल (3 ते 4 हजार), वाटाणा – 30 क्विंटल (8 ते 10 हजार), शेवगा – 14 क्विंटल ( 5 ते 6 हजार), गाजर – 48 क्विंटल (2,500 ते 3,500 रु.).

पालेभाज्या : पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व भाज्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे – मेथी – एकूण 18 हजार 590 जुड्या (1 हजार ते 1,500 रुपये), कोथिंबीर – एकूण 29 हजार 540 जुड्या (600 ते 1,200 रुपये,), शेपू – एकूण 2 हजार 450 जुड्या
(800 ते 1,200 रुपये), पालक – एकूण 1 हजार 950 जुड्या (1 हजार ते 1,500 रुपये).

जनावरे : जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 55 जर्शी गायींपैकी 32 गायींची विक्री (15 ते 45 हजार), 65 बैलांपैकी 45 बैलांची विक्री ( 15 ते 35 हजार), 110 म्हशींपैकी 72 म्हशींची विक्री (25 ते 60 हजार), 2,500 शेळ्यांपैकी 2,250 शेळ्यांची विक्री (2 ते 12 हजार).

Back to top button