पिंपरी : निवृत्त कर्मचार्‍यांनी आपले आरोग्य जपावे; अतिरिक्त आयुक्त जगताप यांचे प्रतिपादन

पिंपरी : निवृत्त कर्मचार्‍यांनी आपले आरोग्य जपावे; अतिरिक्त आयुक्त जगताप यांचे प्रतिपादन
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांनी सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आपल्या आरोग्याची जपणूक करुन आनंदाने जगावे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांच्यासह 18 अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले. त्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या कार्यक्रमास आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे उमेश बांदल, मनोज माछरे, चारुशीला जोशी, गणेश लोंढे आदी उपस्थित होते.

निवृत्त झालेल्यांमध्ये कार्यालय अधिक्षक लक्ष्मण काळे, प्रभाकर शेलूकर, कनिष्ठ अभियंता उल्हास भालेराव, कल्पना गोलहार, नयना घोलप, रामदास गव्हाणे, हंसराज साळवे, मनोरंजन वागतकर, प्रकाश जाधव, मधुकर जाधव, किशोरीलाल यादव, सुधीर माने, वनिता माकर, सुरेखा वाघचौरे, वीजेंद्र सौदे, रेखा गोहर, हनुमंत तेलगू यांचा समावेश आहे. उल्हास जगताप म्हणाले, की महापालिकेचे 18 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रमोद जगताप यांनी सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल पुराणिक यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news