संपूर्ण पुणे जिल्हा जुलैअखेर टँकरमुक्त | पुढारी

संपूर्ण पुणे जिल्हा जुलैअखेर टँकरमुक्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटला असून, या भागात सुरू असलेले पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जिल्हा टँकरमुक्त झाला आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या 60 च्या पुढे गेली होती. यंदा उन्हाळ्यात जिल्ह्यात 4 एप्रिल रोजी आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील वाड्यांवर पहिला टँकर सुरू करावा लागला होता.

जुलै महिन्यातही जिल्ह्यातील आंबेगाव, भोर, हवेली, जुन्नर, खेड आणि पुरंदर तालुक्यांमधील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या आठवड्यात 22 जुलैपर्यंत आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात मिळून पाच टँकर सुरू होते. 28 जुलै रोजी जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील 320 लोकसंख्येच्या एका गावात एक शासकीय टँकर सुरू होता. हा टँकरही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा टँकरमुक्त झाला आहे.

Back to top button