पुणे : इंदापूरला दोन्ही माजी मंत्र्यांचा लागणार कस | पुढारी

पुणे : इंदापूरला दोन्ही माजी मंत्र्यांचा लागणार कस

शेळगाव, संतोष ननवरे : पुणे जि.प. गटाचे व पंचायत समिती गणांचे आरक्षण गुरुवारी (दि. 28) जाहीर झाले असून इंदापूर तालुक्यात पुणे जिल्हा परिषदेचे नव्याने झालेल्या निमगाव केतकी-शेळगाव जिल्हा परिषद गटाचे व शेळगाव व निमगाव केतकी पंचायत समिती गणाचे आरक्षण हे सर्वसाधारण पुरुष जाहीर झाले आहे. हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर इंदापूर तालुक्यातील या गटात व गणात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडील इच्छुकांना सदस्यपद खुणावू लागले आहे. मात्र, उमेदवारी देताना या दोन्ही माजी मंत्र्यांचा कस लागणार आहे.

पूर्वीचा निमगाव केतकी-निमसाखर जिल्हा परिषद गट व शेळगाव-निमगाव केतकी-निमसाखर पंचायत समिती असलेल्या गणावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची अनेक वर्षांपासून एकहाती सत्ता होती व आजदेखील आहे. परंतु, नव्याने झालेल्या निमगाव-शेळगाव जिल्हा परिषद गटात व शेळगाव व निमगाव केतकी पंचायत समिती गणात अनेक गावांचा फेरबदल झाला आहे.

यामुळे नव्याने अस्तित्वात आलेला हा जिल्हा परिषद गट माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कमळाला साथ देणार की नव्याने झालेला गट व गण माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घड्याळाला साथ देणार हे चित्र आगामी काळात स्पष्ट होईल.

Back to top button