पिंपरी : पार्सलमधून वस्तू काढणार्‍यावर गुन्हा | पुढारी

पिंपरी : पार्सलमधून वस्तू काढणार्‍यावर गुन्हा

पिंपरी : कुरियर पार्सलमधून मौल्यवान वस्तू काढून घेणार्‍या कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 7 ते 15 एप्रिल या कालावधीत आंबेठाण, चाकण येथील अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस, आंबेठाण येथे घडली. सुहेल हरून तांबोळी (रा. सोलापूर शहर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी सुशील उदयसिंहराव गायकवाड (37, रा. बावधन, ता मुळशी) यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अ‍ॅमेझॉन सेलर सर्व्हिसेस कंपनीत नोकरी करतात. ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूंना पॅकिंग करून त्याची डिलिव्हरी करण्याचे काम फिर्यादी यांच्या कंपनीच्या मार्फतीने केले जाते. दरम्यान, ग्राहकांच्या पार्सलमधून अ‍ॅपल, वन प्लस कंपनीचे मोबाईल आणि स्मार्ट वॉच, असा एक लाख 84 हजार 338 रुपयांच्या वस्तू काढून घेतल्या. चाकण पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button