पिंपरी : कोरोना रुग्णांचा उतरता-चढता आलेख | पुढारी

पिंपरी : कोरोना रुग्णांचा उतरता-चढता आलेख

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना रुग्णसंख्येचा आलेख सध्या उतरता-चढता असा पाहण्यास मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्णसंख्या कमी होत असताना गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. 22 तारखेला शहरात 212 बाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर रुग्णसंख्या कमी-कमी होत गेली.

25 तारखेला केवळ 72 बाधित रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात 144 बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, बुधवारी दिवसभरात 160 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्या सक्रिय रुग्णांची संख्या मात्र सध्या दहा रुग्णांच्या पुढे सरकलेली नाही. गृहविलगीकरणात उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या मात्र जास्त आहे. सध्या 1 हजार 117 सक्रिय रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार करण्यात येत आहे.

आज दिवसभरात 1 हजार 207 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात आली. तर, 231 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 67 हजार 128 बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 3 लाख 62 हजार 107 रुग्ण बरे झाले. तर, 4 हजार 625 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दिनांक बाधित रुग्ण रुग्णालयातील सक्रिय रुग्ण
22 212 9
23 195 9
24 166 8
25 72 8
26 144 10
27 160 10

Back to top button