पुणे : दौंडच्या पूर्व भागातील एसटी सेवा विस्कळीत | पुढारी

पुणे : दौंडच्या पूर्व भागातील एसटी सेवा विस्कळीत

देऊळगाव राजे, पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात मंगळवारी (दि. 26) दिवसभर एसटी महामंडळ सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.

सोमवार (दि. 25) पासून साधारणपणे एसटी महामंडळाच्या काही फेर्‍या बंद आहेत. सिद्धटेक, शिरापूर, देऊळगाव राजे, हिंगणी बेर्डी, वडगाव दरेकर, पेडगाव, आलेगाव, खोरवडी या गावातून दौंडला जाण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थी एसटीने जात असतात.
काही नागरिक आपल्या दैनंदिन कामासाठी तर विद्यार्थी शाळेसाठी जातात. मात्र सोमवारपासून एसटीची फेरी होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

काही विद्यार्थ्यांची तर मंगळवारी शाळेला गैरहजेरी लागली. बहुतांश विद्यार्थी हे शाळेला जाण्यासाठी एसटी महामंडळ यांचे मासिक पास काढून प्रवास करीत असतात. पण एसटीच वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत गैरहजेरी होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्या, अशी मागणी प्रवासी आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

एसटीच्या फेर्‍या सुरळीत चालू करण्यात आल्या आहेत. दौंड-सिद्धटेक ही शटल गाडी व्यवस्थित सुरू झाली आहे. त्यामुळे इथून पुढे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.

                                                           – आर. डी. मगर, व्यवस्थापक, दौंड आगार

Back to top button