पुणे जिल्ह्यातील 25 धरणांत 121 टीएमसी पाणीसाठा | पुढारी

पुणे जिल्ह्यातील 25 धरणांत 121 टीएमसी पाणीसाठा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील भीमा खोर्‍यातील 25 पैकी 22 धरणांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. तर, एकूण सर्व धरणांमध्ये 121.21 टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यंदा जूनअखेरपर्यंत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धरणांनी तळ गाठला होता. परिणामी, शहरात पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरणक्षेत्रात पाऊस झाला. त्यामुळे धरणांत येणार्‍या पाण्याचा येवा वाढला. त्यामुळे पाणीपातळीत वाढ होत राहिली. साधारणपणे आठवडाभराच्या चांगल्या पावसामुळे धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला.

ही धरणे 100 टक्के भरली
खडकवासला, कळमोडी, चासकमान, आंद्रा आणि वीर ही धरणे 100 टक्के भरली आहेत. तर, वडज, येडगाव, भामा-आसखेड, वडीवळे, कासारसाई आणि गुंजवणी या सहा धरणांमध्ये 80 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे पुणे शहराचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

Back to top button