जुन्नर : कुकडी प्रकल्पात 65 टक्के पाणीसाठा | पुढारी

जुन्नर : कुकडी प्रकल्पात 65 टक्के पाणीसाठा

जुन्नर; पुढारी वृतसेवा: जुन्नर व आंबेगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कुकडी प्रकल्पात शनिवारअखेर (दि. 23) तब्बल 19.42 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला. मागीलवर्षी या दिवशी केवळ 10. 73 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. धरणाच्या साठवण क्षेत्रात पडणार्‍या पावसामुळे सर्व धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर पाहता काही दिवस पडल्यास सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी कमी पावसामुळे माणिकडोहमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा जमा झाला होता. यंदा जुलैअखेर पाणीसाठा 53 टक्के झाल्यामुळे शेतकरीवर्गांत आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, वडज व येडगावमधून अनुक्रमे 200 व 1400 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. पिंपळगाव जोगा धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण भरण्याच्या मार्गावर आहे. तर नयनरम्य व पर्यटकांचे आकर्षण ठरणार्‍या चिल्हेवाडी धरणातूनही पाणी सोडले जात आहे.

कुकडी प्रकल्पांतर्गत आजअखेरचा उपयुक्त पाणीसाठा : (टीएमसी / टक्केवारी)
डिंभे 8.95 71.59
माणिकडोह 5.38 52.89
वडज 0.95 81.04
येडगाव 1.79 91.91
पिंपळगाव जोगे 2.35 60.44
चिल्हेवाडी 0.61 76.55

Back to top button