नसरापूर : सोनार बापलेकाला पोलिस कोठडी | पुढारी

नसरापूर : सोनार बापलेकाला पोलिस कोठडी

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा: नसरापूर परिसरातील लोकांना सोने व्यवसायात 80 लाखांचा गंडा घालून फरार झालेल्या बापलेकाला पकडल्याची बातमी दै. पुढारीने प्रसिद्ध केली. या बातमीनंतर परिसरातील तक्रादारांची संख्या वाढली असून, पोलिस ठाण्याबाहेर तक्रारदारांची दिवसभर रांग लागली होती. बाबूसिंग केशरसिंग चौहान (वय 57), शैलेंद्र ऊर्फ शैलेश बाबूसिंग चौहान (वय 22, रा. तवाव, ता. जसवंतपूर, जि. जालोर, राजस्थान) या बापलेकांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.

मुख्य सूत्रधार मंगेश बाबुसिंग चौहान (वय 25) हा फरार असून, राजगड पोलिस त्याचा शोध घेत आहे. नसरापूर (ता. भोर) येथे बनेश्वर ज्वेलर्स नावाने सोन्या-चांदीचा व्यापार करीत असताना परिसरातील लोकांना 80 लाखांचा गंडा घालून ते राजस्थानात पळून गेले होते.
राजगड पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन चार दिवस शोध घेऊन बुधवारी (दि. 20) आरोपींना राजगड पोलिस ठाण्यात आणले. याबाबतची बातमी दैनिक पुढारीत प्रसिध्द झाली. यामुळे गुरुवारी तक्रारदारांची राजगड पोलिस ठाण्यात रीघ लागली होती.

Back to top button