पुणे : शिक्षणापासून वंचित मुलांना शैक्षणिक पाठिंबा महत्त्वाचा : डॉ. मधुसूदन झंवर | पुढारी

पुणे : शिक्षणापासून वंचित मुलांना शैक्षणिक पाठिंबा महत्त्वाचा : डॉ. मधुसूदन झंवर

पुणे : ‘शिक्षणामुळे माणूस आयुष्यातील कोणतेही ध्येय गाठू शकतो. त्यामुळे केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना शिक्षणाचा पाठिंबा देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठिंबा देऊन उद्याचे उज्ज्वल नागरिक तुम्ही घडवत आहात,’ असे मत ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. मधुसूदन झंवर यांनी व्यक्त केले. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने राज्यातील 1500 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार बूब, जुगलकिशोर पुंगलिया, श्यामसुंदर कलंत्री, राजेश कासट, दादा गुजर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. नवनीत मानधनी, दुर्गेश चांडक आदी मान्यवर उपस्थित होते. मराठवाड्यातील 200 गरजू विद्यार्थ्यांना पुण्यातील कार्यक्रमात शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच बीड, अहमदनगर, रायगड, राजगड, तोरणा, मुळशी, तिकोना, तुंग, लोहगड आणि पौड परिसरातील गावांमधील गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्यात आले आहे. प्रमोदकुमार जाजू यांनी सूत्रसंचालन केले. दुर्गेश चांडक यांनी प्रास्ताविक, तर मुकेश माहेश्वरी यांनी आभार मानले.

Back to top button