पुणे : पुरुष नसबंदीसाठी डॉक्टर केवळ सहाच | पुढारी

पुणे : पुरुष नसबंदीसाठी डॉक्टर केवळ सहाच

पुणे : पुरुष नसबंदीबाबत उदासिनतेचे चित्र दिसत असतानाच पुण्यात ही शस्त्रक्रिया करणारे सहाच तज्ज्ञ डॉक्टर असल्याची बाब समोर आली आहे. शहरात कमला नेहरू रुग्णालयात प्रामुख्याने शस्त्रक्रिया होत आहेत. याशिवाय, विनाछेद, विनाटाका शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. दर तीन महिन्यांनी पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात येते. पंधरा दिवस हे शिबीर चालते. 15 दिवसांत जेमतेम 10 शस्त्रक्रिया होतात.

नसबंदीची शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर तज्ज्ञ असावेत आणि त्यांना किमान 25 विनाछेद, विनाटाका शस्त्रक्रियांमध्ये सहाय्यक म्हणून काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक असते. त्यासाठी शस्त्रक्रियेचे तंत्र शिकून घ्यावे लागते. पुण्यात कमला नेहरू, औंध जिल्हा रुग्णालय, ससून येथील ट्रेनिंग सेंटरमधून त्याचे प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनतर्फेही अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.

Back to top button