पुणे : जिल्हा परिषदेत आता ओबीसींसाठी 22 गट; महिला प्रवर्गांसाठी 11 जागा शक्य | पुढारी

पुणे : जिल्हा परिषदेत आता ओबीसींसाठी 22 गट; महिला प्रवर्गांसाठी 11 जागा शक्य

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा परिषदेच्या 82 पैकी 22 आणि पंचायत समितीच्या 44 जागा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित होणार आहे. त्याचबरोबर 11 जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित होऊ शकतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणासह निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे इच्छुक पुन्हा एकदा तयारीला लागणार आहेत. याशिवाय कोणत्या गटासाठी आरक्षण जाहीर होते, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील सदस्यांची संख्या ही 75 इतकी होती.

त्यात सुधारणा केल्याने, आता आणखी सातने वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण जिल्हा परिषद सदस्यांची संख्या आता 82 होणार आहे. पूर्वीच्या एकूण 75 जागांपैकी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) एकूण 20, अनुसूचित जातीसाठी (एससी) सात आणि अनुसूचित जमातीसाठी (एसटी) पाच अशा एकूण जागा राखीव होत्या. उर्वरित 43 जागा या खुल्या गटांसाठी होत्या. मात्र, यापैकी 22 जागा या खुल्या गटातील महिलांसाठी राखीव होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहातील 75 पैकी 21 जागा या खुल्या गटासाठी होत्या.

Back to top button