पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या आजपासून प्रवेश परीक्षा | पुढारी

पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या आजपासून प्रवेश परीक्षा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शाखांच्या अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, त्याची प्रवेश परीक्षा उद्या (दि.21) पासून सुरू होत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी एकूण 21 हजार 670 अर्ज आले आहेत. महाराष्ट्रासह भारतातील 22 केंद्रांवर ही पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठीची ऑनलाईन परीक्षा 21 ते 24 जुलैदरम्यान होणार आहे. ही परीक्षा शंभर गुणांची असून, यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे.

ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज आले आहेत, त्या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना मेलच्या माध्यमातून कळवले आहे. विद्यापीठात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची ही प्रवेश प्रक्रिया होत असून, याअंतर्गत पदवी, पदव्युत्तर पदवी, पदविका, पदव्युत्तर पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा एकूण 174 अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. त्यामधील 93 अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा 21 ते 24 जुलैदरम्यान होणार आहे. या 174 अभ्यासक्रमांच्या एकूण 7 हजार 850 जागा उपलब्ध आहेत.

Back to top button