पुणे : कोरोनाबाधितांमध्ये 18 टक्क्यांनी घट | पुढारी

पुणे : कोरोनाबाधितांमध्ये 18 टक्क्यांनी घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये 18 टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. सध्या राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 5413 सक्रिय रुग्ण आहेत.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत 11 ते 17 जुलै या कालावधीतील ही घट आहे. चौथ्या लाटेच्या सुरुवातीला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. चार-पाच आठवड्यांनंतर येथील रुग्णसंख्या कमी होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील आलेख झपाट्याने वाढला.

सध्या नागपूरमधील कोरोनाबाधितांमध्ये 55 टक्क्याने वाढ आणि नाशिकमधील रुग्णसंख्येत 44 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. ठाण्यात सर्वाधिक साप्ताहिक 12 इतके मृत्यू नोंदवले गेले. त्यानंतर मुंबई, पुणे आणि सातारा यांचा क्रमांक लागतो. सध्या पुणे, अमरावती, अकोला, औरंगाबाद आणि वाशीममध्ये सर्वाधिक सकारात्मकता दिसून येत आहे.

आरोग्य विभागाकडून घेतली जाणारी काळजी
योग्य चाचणी धोरण

दाखल प्रकरणांचे सखोल विश्लेषण आणि जिनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुना संदर्भ.

मृत्यूचा वेळेवर अहवाल आणि तपशीलवार मृत्यू लेखापरीक्षण.

चिंताजनक प्रकरणांची विस्तृत महामारीविषयक तपासणी.

Back to top button