पुणे : एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर छापा; 55 जणांवर कारवाई | पुढारी

पुणे : एकाच वेळी सहा ऑनलाइन जुगार अड्ड्यांवर छापा; 55 जणांवर कारवाई

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राजरोसपणे चालणार्‍या सहा ऑनलाईन जुगार अड्ड्यांवर एकाचवेळी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापे टाकून 55 जणांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. यावेळी 4 लाख 55 हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

मोठी बातमी! शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदारांचा स्वतंत्र गट, लोकसभा अध्यक्षांना दिले पत्र

सोमवारी (दि. 19) सायंकाळी सुमारास अवैध मटक्याच्या ऑनलाईन धंद्याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांना माहिती मिळाली होती. शिवाजीनगर परिसरातील महापालिका चौक जवळ सिंध पंजाब हॉटेलच्या एकाच लाईनीतील एकुण सहा गाळ्यात स्वस्तिक लॉटरी सेंटर, स्टार लॉटरी सेंटर, सवेरा लॉटरी सेंटर, साई प्रतिक लॉटरी सेंटर, शहा लॉटरी सेंटर, जीपीएस लॉटरी सेंटर अशा वेगवेगळ्या नावाने सदरचा ऑनलाईन लॉटरीचे नावाखाली ऑनलाइन जुगार अड्डे सुरू होते. या जुगार अड्ड्यांचे मुख्य प्रवेशद्वारांवर जाड कापडाचे गडद रंगाचे मळके पडदे लावलेल्या अवस्थेत होते. त्यामुळे आत लाईट सुरू असला, अथवा कितीही गर्दी झाली तरीही, बाहेरच्या व्यक्तीस आतले काहीच दिसत नव्हते.

नुपूर शर्मा यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाचा दिलासा, १० ऑगस्‍टपर्यंत अटक न करण्‍याचे आदेश

जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेची माहिती समजल्यानंतर बनावट ग्राहकासह पोलीस पथकाने छापे टाकले. यावेळी जुगाराच्या साहित्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला. ऑनलाईन जुगार प्रकारात जुगार अड्डा मालक, चालक, बुकीज यांनी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून, संगणकावर ऑनलाईन व्यवहार करुन शासन महसूल बुडवून, राज्य सरकारची देखील फसवणूक केली म्हणून ही कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राजेश पुराणिक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक यांचे पथकही सहभागी झाले होते.

हेही वाचा

KL Rahul-Athiya Shetty Wedding : राहुल-अथिया शेट्टी ‘या’ दिवशी लग्नबंधनात अडकणार!

Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक आघाडीवर, उरले फक्त तीन विरोधक

Back to top button