पुणे शहराच्या दक्षिण भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद | पुढारी

पुणे शहराच्या दक्षिण भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे : महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वडगाव जलकेंद्र, रॉवॉटर आणि राजीव गांधी पंपिंग स्टेशन येथे विद्युत, स्थापत्यविषयक देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामुळे गुरुवारी (दि.21) दक्षिण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे. सिंहगड रोड आणि कात्रज, कोंढवा भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, कात्रज, धनकवडी, दत्तनगर, भारती विद्यापीठ परिसर आणि कोंढवा बुद्रुक भागाचा समावेश आहे.

हेही वाचा

पुणे शहरातही पावसाची घोडदौड; हंगामात 342 मिमीची नोंद

पंढरपूर : विषबाधाप्रकरणी दोषींवर कारवाई करा

पुणे : होम टेस्टिंग किट मागणीत मोठी घट; ‘अँटिजेन टेस्ट’वर भर

Back to top button