पुणे : चिक्कू, संत्री, पपई महाग; कलिंगड, लिंबू, डाळिंब स्वस्त | पुढारी

पुणे : चिक्कू, संत्री, पपई महाग; कलिंगड, लिंबू, डाळिंब स्वस्त

पुणे : पावसाच्या संततधारेमुळे मार्केट यार्डातील फळबाजारात फळांची आवक घटली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी पडल्याने संत्र्याचे भाव दहा टक्क्यांनी तर चिक्कूचे भाव गोणीमागे शंभर रुपये व पपईचे भाव किलोमागे दोन रुपयांनी वधारले आहेत. राज्याच्या विविध भागात मागील पाच ते सहा दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने बहुतांश फळांची तोडणी झाली नाही. त्याचा परिणाम बाजारातील आवक घटण्यावर झाला आहे. पावसामुळे डाळींब व सिताफळाच्या दर्जात सुधारणा झाली असून त्यांची आवकही वाढू लागली आहे. परिणामी, डाळींबाच्या भावात गत आठवड्याच्या तुलनेत दहा टक्क्यांनी घट झाली आहे. बाजारात कलिंगड व लिंबाचीही चांगली आवक होत आहे. मात्र, त्यातुलनेत मागणी नसल्याने लिंबाच्या भाव 15 किलोंच्या गोणीमागे शंभर रुपये तर कलिंगड किलोमागे 2 रुपयांनी उतरले आहेत.

बाजारातील आवक जावक कायम असल्याने बहुतांश फळांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. रविवारी (दि. 17) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस 4 ट्रक, मोसंबी 30 ते 40 टन, संत्री 1 टन, डाळिंब 40 ते 45 टन, पपई 8 ते 10 टेम्पो, लिंबे सुमारे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू 250 ते 300 के्रटस्, चिक्कू 100 पोती, कलिंगड 2 ते 4 गाड्या, खरबुज 1 ते 2 गाड्या व सिताफळाची 4 ते 5 टन इतकी आवक झाली. फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 200-500, मोसंबी : (3 डझन) : 120-300 (4 डझन) 40-100, अननस : 70-270, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 35-120, गणेश : 5-30, आरक्ता 10-50. कलिंगड : 7-10, खरबूज : 15-20, पपई : 8-22, पेरू (20 किलो) : 200-500, चिक्कू : 200-500, सिताफळ : 20 ते 180.

Back to top button