किरकटवाडी : फार्म हाऊस, हॉटेल्सवर गर्दी | पुढारी

किरकटवाडी : फार्म हाऊस, हॉटेल्सवर गर्दी

किरकटवाडी : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटन स्थळी पर्यटकांना प्रवेशास मनाई करण्यात आली. त्यामुळे शाळांना तीन दिवस सुटी आणि रविवारचा दिवस कारणी लावण्यासाठी पर्यटकांनी पावसाने उघडीप देताच खडकवासला, सिंहगड-पानशेत खोर्‍यातील विविध फार्म हाऊस आणि हॉटेल्सकडे आपला मोर्चा वळवला. त्यामुळे खडकवासला धरण चौपाटी आणि सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांना नाकेबंदी करावी लागली. पर्यटनस्थळावरी प्रवेशचा बंदी आदेश झुगारून खडकवासला पंचक्रोशीतील सिंहगड, पानशेत खोर्‍यात हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती.

पावसाने उघडीप दिल्याने सिंहगडला जाण्याच्या इराद्याने आम्ही निघालो होतो; परंतु सिंहगड बंद असल्याचे कळाल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा पानशेतकडे वळवला. जाताना आणि येतानाही रहदारी खूप होती. पानशेतवरून येताना तीन तास लागले.

                                                  – प्रभाकर घोडके, पर्यटक

Back to top button