पिंपरी : दुचाकीस्वारांना लुबाडून मारहाण | पुढारी

पिंपरी : दुचाकीस्वारांना लुबाडून मारहाण

पिंपरी : भोसरीतील नाशिक-पुणे हायवेवरील दत्त मंदिरासमोर एका दुचाकीचालकास तीन अज्ञात इसमांनी मारहाण करीत खिशातील सातशे रुपये रोख काढून घेतले आहेत. ही घटना शुक्रवारी (15 रोजी) रात्री साडेनऊ वाजता घडली आहे.

फिर्यादी बालाजी बस्वराज चावरे (वय 24, व्यवसाय चालक, रा. अलंकापुरम सोसायटी, चर्‍होली. मुळगाव-उदगीर, जि. लातूर) हे कामावरून घरी जात असताना तीन अज्ञात इसमांनी त्यांना अडवून लोखंडी रॉड व चाकुने जखमी करून खिशातील 700 रूपये रोख काढून घेतले.

यातील एकाने हातातील चाकुने वार करीत मी भोसरीचा भाई सागर हिवरे आहे. मला कोण आडवतय तेच बघतो. असे ओरडत दहशत पसरवली आहे.याविरोधात भोसरी ठाण्यात शनिवारी (दि.16 रोज) फिर्याद दिली आहे.

Back to top button