पिंपरीत दहशत माजविणार्‍यास अटक | पुढारी

पिंपरीत दहशत माजविणार्‍यास अटक

पिंपरी : पिंपरीतील मिलिंदनगरमध्ये दुचाकीसमोर आडवा होऊन, चाकू लावत 12 हजारांचा मोबाईल व खिशातील दोनशे रुपये रोख काढून घेणार्‍या आरोपीस पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (14 रोजी) रात्री नऊ वाजता घडली.

फिर्यादी सुरज बळी सोनकांबळे (वय 25, रा. भाटनगर कमानीजवळ, पिंपरी) हे दुचाकीवरून घरी जात असताना आरोपी राहुल टोनपे (वय 28, रा. मिलिंदनगर, पिंपरी) हा फिर्यादीच्या गाडीसमोर येऊन शिवीगाळ करीत, चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचा 12 हजारांचा मोबाईल व 200 रुपये रोख घेऊन गेला.

फिर्यादीने याविरोधात शनिवारी (16 रोजी) पहाटे अडीच वाजता पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीस कलम 392 अंतर्गत जबरी चोरीचा गुन्हा नोंदवीत अटक केली आहे.

Back to top button