पुणे : ‘आपत्कालीन’व्यवस्थापनासाठी तत्काळ मिळणार निधी | पुढारी

पुणे : ‘आपत्कालीन’व्यवस्थापनासाठी तत्काळ मिळणार निधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा: अतिवृष्टी झाल्यास निधीची मागणी केल्यानंतर तत्काळ आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्ध करावा, अशा सूचना गटविकास अधिकार्‍यांना जिल्हा परिषदेने दिल्या आहेत. जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे, तर काही ठिकाणी आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी झाल्याने ग्रामीण भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते.

आपत्कालीन परिस्थितीत रस्ते खराब होणे, छोटे-मोठे पूल खराब होणे, डोंगर, कडा कोसळणे, पूर इत्यादींमुळे नागरिकांचे स्थलांतर करणे, नागरिकांना औषधोपचार करणे इतर अन्य बाबींसाठी अंदाजपत्रकात आपत्कालीन व्यवस्थापन अंतर्गत अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यासाठी आवश्यकतेनुसार गटविकास अधिकार्‍यांनी निधीची मागणी करावी, त्यानंतर जिल्हास्तरावरून निधी वितरित करण्यात येईल, असे परिपत्रक जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहे.

Back to top button