पिंपरी : दिवसभरात कोरोनाचे 183 रुग्ण | पुढारी

पिंपरी : दिवसभरात कोरोनाचे 183 रुग्ण

पिंपरी:  कोरोनाचे शनिवारी (दि. 16) दिवसभरात 183 बाधित रुग्ण आढळले. तर, दिवसभरात 238 रुग्ण बरे झाले. आज दिवसभरात 640 संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या 55 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, 1 हजार 213 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

शनिवारी (दि.16) दिवसभरात 1 हजार 884 जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले. तर, आतापर्यंत एकूण 36 लाख 79 हजार 882 नागरिकांचे कोरोना लसीकरण केले आहे. त्यामध्ये पहिला, दुसरा आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांचा समावेश आहे.

Back to top button