वाकड परिसरातील रस्त्यांची चाळण | पुढारी

वाकड परिसरातील रस्त्यांची चाळण

वाकड : पुढारी वृत्तसेवा : पावसामुळे येथील मातोबानगर झोपडपट्टी समोरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावरील डांबर गायब होऊन खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यामध्ये रात्रीच्यावेळी समोरून डोळवरती लाईट आल्यामुळे काही दिसत नाही. त्यातच अचानक समोर खड्डा आल्यामुळे ब्रेक दाबला की गाडी स्लीप होत आहे. त्यामुळे वाकड येथील मातोबानगर झोपडपट्टी समोरील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

या रस्त्यावर दहा ते पंधरा खड्डे पडले आहेत. त्यातच पावसाचे पाणी खड्ड्यात जमा होत असल्यामुळे पायी चालणार्‍यांच्या अंगावर उडत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील आठवड्यापासून शहरात मुसळधार पाउस सुरू आहे. त्यामुळे वाकड परिसरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, त्यांनी ठेकेदारांच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे.

वाकड परिसरातील खड्डे त्वरित दुरुस्त करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी मातोबानगर येथील नागरिक विकास जगधने, दीपक चखाले, सचिन आडागळे संतोष ऊल्हारे, बाबासाहेब गायकवाड यांसह अन्य उपस्थित होते.

Back to top button